बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024 (14:10 IST)

विजेचा धक्का लागून दोन जणांचा मृत्यू

छत्तीसगड मधील कोरबा मध्ये वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी शिकाऱ्यांनी लावलेल्या विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
  
मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाला. तसेच वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी ही विद्युत तार टाकण्यात आली होती. या घटने बद्दल पोलीस अधिकारींनी सांगितले की, सोमवारी सायंकाळी उशिरा हा अपघात झाला असून ही घटना कोरबा जिल्ह्यातील बाल्को पोलीस स्टेशन परिसरात बेला गावात घडली आहे.
 
गावाजवळील जंगलात विजेचा धक्का लागून दोन गावकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच मृत्युमुखी पडलेले दोन्ही गावकरी सोमवारी मासेमारीसाठी तापरा गावात गेले होते. तसेच जंगलात पडलेल्या विजेच्या ताराबाबत दोघांनाही माहिती नव्हती.सायंकाळी ते बेला या गावी परतत असताना हा भीषण अपघात झाला. दोघीही जंगलाजवळ टाकलेल्या विजेच्या तारात अडकल्याने विजेचा धक्का लागून दोघांचा जागीच मृत्यू झाला.  

Edited By- Dhanashri Naik