गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 11 सप्टेंबर 2024 (14:21 IST)

धक्कादायक प्रकार : 3 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

crime
छत्तीसगड मधून एक धक्कादायक बातमी सामोर आली आहे. बिलासपुर मध्ये तीन वर्षाच्या चिमुरडी सोबत दुष्कर्म करण्यात आले आहे. ही लहान मुलगी बिस्कीट घेण्यासाठी दुकानात गेली होती. या दरम्यान आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मिळालेल्या माहितीनुसार दुकानदाराने बिस्कीट देण्याच्या बहाण्याने तिला दुकानात बोलावले होते.
 
रक्तबंबाळ झालेली चिमुरडी कशीबशी आपल्या घरी पोहचली. या चिमुरडीच्या प्रायव्हेट पार्ट मधून रक्त निघत होते. आपल्या लहान मुलीला या अवस्थेत पाहून कुटुंबाला धक्काच बसला. आपल्या मुलीला या अवस्थेत पाहून मुलीची आई बेशुद्ध पडली. चिमुरडीला वेदना असह्य झाल्या होत्या. 
 
नंतर या चिमुरडीने आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर मुलीच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.  
 
कारवाई दरम्यान पोलिसांना समजले की, चिमुरडी जेव्हा बिस्कीट घ्यायला गेली तेव्हा दुकानात हा आरोपी एकटाच होता व त्याने या मुलीसोबत दुष्कर्म केले. आरोपी दुकानदार हा विवाहित असून तीन मुलींचा पिता आहे.