रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जून 2022 (07:52 IST)

साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा

hang
मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने शिक्षा सुनावली. आरोपीला दिंडोशी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली. मोहन चौहान असे आरोपीचे नाव आहे. हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालवण्यात आले होते. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं सांगत सरकारतर्फे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.
 
आरोपीने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घातली होती. पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात मोहन चौहानला अटक करण्यात आली होती. त्याने महिलेवर बलात्कार करून पळ काढला होता. सीसीटीव्हीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी त्याला पकडले. 18 दिवसांत मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.
 
नेमके प्रकरण काय?
 
साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाला. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना 9 सप्टेंबर 2021च्या रात्री घडली. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं अमानुष कृत्य केलं. घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
 
साकीनाका बलात्कार प्रकरणातील दोषी मोहन चौहान हा ड्रायव्हरचं काम करायचा. तो आता 45 वर्षांचा आहे.  जेव्हा शिक्षेची मागणी करण्यात आली, तेव्हा मोहन कोर्टरुममध्येच आरडाओरडा करु लागला. त्यामुले न्यायाधीशांनी आरोपीला बाहेर पाठवले. इतकंच काय तर आरोपीची कोर्टरुममधील बेशिस्त वागणूक पाहून सरकारी वकिलांनी आरोपीत सुधारणा होणार नसल्याचे सांगितले.