रविवार, 10 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 29 ऑक्टोबर 2024 (12:15 IST)

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर आता मुलगा जिशान यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली

राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचा आमदार मुलगा जिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या असून यासोबतच सलमान खानलाही धमकी देण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी एकाला नोएडा मधून अटक केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार वांद्रे पूर्व येथील जीशानच्या जनसंपर्क कार्यालयात हा धमकीचा फोन आला होता. तसेच जिशान आणि सलमान खान या दोघांना धमकावून पैशांची मागणी करण्यात आली होती.
या कॉलबाबत लॉरेन्स बिश्नोई टोळीवर संशय व्यक्त केला जात आहे.
 
या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला नोएडा येथून अटक केली आहे. आरोपी हा दिल्लीचा रहिवासी आहे. तसेच त्याला अटक करण्यात आली असून मुंबई पोलिसांनी त्याला रिमांडवर घेतले आहे.

Edited By- Dhanashri Naik