1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 12 मार्च 2025 (11:57 IST)

मुंबई : मराठीत बोलण्यास नकार दिल्याने मनसे आक्रमक, एअरटेल कर्मचाऱ्याला दिली धमकी

Mumbai News: महाराष्ट्रातील मुंबईती चारकोप परिसरात एअरटेल कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलण्यास नकार दिल्याने मोठा वाद निर्माण झाला.

मिळालेल्या माहितीनुसार एक मराठी तरुण आणि एअरटेल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या घटनेनंतर मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एअरटेलच्या कार्यालयांवर आक्रमक निदर्शने केली. महाराष्ट्राच्या काही दिवसांपासून विविध ठिकाणी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण तापत असल्याचे दिसत आहे.
तसेच माहिती समोर आली आहे की, मनसे आणि शिवसेना मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एअरटेलच्या कार्यालयावर आक्रमक होतांना दिसले. माहिती समोर आली आहे की एक तरुण तक्रार घेऊन एअरटेल ऑफिस मध्ये गेला होता. एअरटेलच्या महिला कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलण्यास नकार दिला. यामुळे तो तरुण चिडला. तसेच यावर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी मालाड एअरटेलच्या कार्यालयाला धमकी दिली आहे. तसेच अखिल चित्रे यांनी उघडपणे धमकी दिली, तुम्ही मराठी भाषेचा आदर केला नाही तर आम्हीही देखील तुमचा आदर करणार नाही. असे देखील यावेळी म्हणाले.
शिवसेना नेते अखिल चित्रे म्हणाले की एअरटेल कस्टमर केअरला कॉल केल्यावर ते बोलतात की हिंदीसाठी एक बटण दाबा, मराठीसाठी दोन बटन दाबा, इंग्रजीसाठी तीन बटन दाबा. कोणतेही बटण दाबले तरी फक्त हिंदीमध्ये बोलतात. एअरटेलच्या कोणत्याही गॅलरीमध्ये मराठी भाषिक कर्मचारी नाहीत आणि आम्ही मराठी भाषिकांना कामावर ठेवण्याची मागणी केली आहे असे देखील ते म्हणाले.
Edited By- Dhanashri Naik