सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 17 ऑक्टोबर 2020 (08:06 IST)

सर्व महिलांना मुंबईच्या लोकलमधून प्रवास करता येणार

मुंबईच्या लोकल मधून आता सर्व महिलांना प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारने याबाबत परीपत्रक जाहीर केलं आहे. आज पासून म्हणजे शनिवारपासून होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवापासुन महिलांना लोकल प्रवासाची परवानगी दिली  आहे.
 
लोकलमध्ये गर्दी होऊ नये या दृष्टीने महिलांना लोकल प्रवास सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत तर संध्याकाळी ७ नंतर शेवटची लोकल असे पर्यंत प्रवास करण्याची परवानगी महिलांना राज्य सरकारने दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे मुंबई आणि MMR मधील महिलांना प्रवेश करता येणार आहे. तसेच यासाठी QR code गरज लागणार नाही.