व्हाईट डिस्चार्जचा त्रास होत आहे, तर मग हे करून बघा

Last Modified बुधवार, 7 ऑक्टोबर 2020 (10:00 IST)
प्रत्येक बाईला पांढऱ्या स्त्रावाचा समस्येतून जावं लागतं. ही समस्या किंवा हा त्रास एक अतिशय सामान्य बाब आहे. जर आपण देखील या त्रासाशी झुंजत आहात तर आम्ही इथे आपल्याला काही घरगुती उपाय सांगत आहोत, जे उपाय आपण केल्यानं एका आठवड्यातच आपल्याला या त्रासापासून सुटका मिळू शकते. मुख्य म्हणजे की आपल्याला हे उपाय केल्यानं काहीही दुष्परिणाम होणार नाही.
सरत्या वयात बायकांना अनेक प्रकारच्या समस्या होऊ लागतात. अश्या बऱ्याच समस्या असतात ज्या आपण कोणाला ही सांगू शकत नाही. त्याबद्दल बोलू शकत नाही. ज्याबद्दल बोलल्यावर देखील अस्वस्थता जाणवते. अश्याच काही त्रासांपैकी एक आहे ते म्हणजे ल्युकोरिया. याला पांढरे पाणी, व्हाईट डिस्चार्ज किंवा श्वेत प्रदर देखील म्हणतात. हा त्रास बायकांना मासिक पाळी येण्याचा काही दिवस पूर्वी किंवा पाळी आल्यावर जाणवतो. तसेच काही बायकांना याचा फार त्रास होतो. त्यांना दररोज या समस्येला सामोरी जावं लागतं.

बायकांना होणारा हा आजार प्रामुख्यानं अशक्तपणा, पोषक तत्त्वांची कमतरता झाल्यामुळे होतो. या त्रासापासून वाचण्यासाठी औषध आणि घरगुती उपाय दोन्ही ही प्रभावी आहेत. जर आपण या समस्येेेेला झुंज देत आहात तर या काही घरगुती उपचार केल्यानं आपल्याला एका आठवड्यातच या समस्येपासून मुक्तता होईल. मुख्य म्हणजे या उपचारांमुळे आपल्याला काहीही दुष्परिणाम होणार नाही.

मेथी दाणा :
बायकांना या समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी मेथीदाणे हा एक प्रभावी मार्ग आहे. यासाठी आपण तीन चमचे मेथी दाणा घ्या आणि त्यांना अर्धा तास अर्ध्या लीटर पाण्यात उकळवून घ्या. नंतर या पाण्याला गाळून घ्या. पाणी थंड झाल्यावर या पाण्याला पिऊन घ्या. दिवसातून किमान दोन वेळा तरी एक एक ग्लास पाणी प्यावं. मेथीदाणा हे मायक्रोफ्लोरा आणि पीएचच्या पातळी राखण्यास मदत करत. याचा दररोज सेवन केल्यानं एका आठवड्यातच आपल्याला या समस्ये पासून आराम मिळू शकतो.
* सकाळी केळी खावे :
फार कमी लोकांना हे माहीत असेल की केळी देखील बायकांच्या आरोग्याशी निगडित या समस्येला संपविण्यासाठी प्रभावी आहेत. बायकांनी दररोज सकाळी पिकलेलं केळ खावं. जर आपण केळीला साजूक तूप लावून खाल्ल्यानं आपणास त्वरित आराम मिळेल. याच बरोबर आपण केळीला साखर किंवा गुळा बरोबर देखील खाऊ शकता. याचे सेवन केल्यानं हानिकारक सूक्ष्म जंत शरीरातून बाहेर पडतील आणि आपल्याला या समस्येतून आराम मिळेल.
* धणे :
धणे हे देखील आपल्याला पांढऱ्या पाण्याच्या त्रासापासून सुटका मिळवून देऊ शकतात. यासाठी बायकांनी 100 ग्रॅम धणे रात्रभर 100 मि.ली. पाण्यात भिजवून ठेवावं. सकाळी हे पाणी गाळून पिऊन घ्या. असे केल्यानं विषारी पदार्थ बाहेर पडतात. दररोज असं करावं, एका आठवड्यात आपल्याला आराम मिळेल.

* आवळ्याची आणि मधाची पेस्ट देखील फायदेशीर आहे :
आवळा तर नेहमीच आरोग्यासाठी फायदेशीर असतो. बायकांना ल्युकोरियाच्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी आवळा आणि मध हे प्रभावी आहे. या साठी दोन चमचे आवळ्याची भुकटी किंवा पूड घ्या आणि त्यामध्ये मध मिसळून घट्ट पेस्ट बनवा. या पेस्टला दिवसातून दोन वेळा खा. या व्यतिरिक्त आवळ्याचं सेवन पाण्यात उकळवून देखील करू शकता. पाण्यात हे टाकून पिण्याची पद्धत म्हणजे आपण एक कप पाण्यात एक चमचा आवळ्याची पूड किंवा भुकटी घालून त्या अर्ध कप होई पर्यंत उकळवून घ्या. आपणास हे चवीला कडवट लागत असल्यास या मध्ये आपण मध किंवा पुन्हा पाणी मिसळू शकता. दररोज हे प्यायल्यानं फायदा होणार.
* जांभळाची साल :
या समस्येतून सुटका मिळविण्यासाठी जांभळाची साल देखील एक प्रभावी उपाय आहे. या साठी आपण फक्त जांभळाच्या सालीची भुकटी बनवा. हे आपण दिवसातून 2 ते 3 वेळा पाण्यासह दोन चमचे खावं. असं केल्यानं आपणांस एका आठवड्यातच आराम मिळेल.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

मधुमेहाच्या रुग्णांसाठी धण्याचे सेवन लाभदायक

मधुमेहाच्या रुग्णांसाठी धण्याचे सेवन लाभदायक
धणे हे भारतीय स्वयंपाक घरातील एक महत्त्वाचा मसाला आहे. धणे मसाल्याच्या रूपात अन्नाची चव ...

पैशांवर प्रेम करणारा पार्टनर ओळखा, आणि योग्य निर्णय घ्या

पैशांवर प्रेम करणारा पार्टनर ओळखा, आणि योग्य निर्णय घ्या
एकदा प्रेमात पडलं की समोरच्याचा प्रत्येक चूक गोष्टी देखील बरोबर वाटू लागतात. काही दिवस ...

मास्कमुळे त्वचेला नुकसान तर होत नाहीये, याप्रकारे करा

मास्कमुळे त्वचेला नुकसान तर होत नाहीये, याप्रकारे करा देखभाल
मास्क वापरणे अत्यंत आवश्यक आहे परंतू मास्कचा अधिक काळ वापर केल्याने चेहर्‍यावर डाग, मुरुम ...

कुरकुरीत भजी व्हावी यासाठी त्यात हे घाला

कुरकुरीत भजी व्हावी यासाठी त्यात हे घाला
भजी करताना घोळमध्ये चिमूटभर अरारोट आणि जरा गरम तेल टाकलं तर भजी कुरकुरीत ...

Aayush Neet UG काउंसलिंग साठी रजिस्ट्रेशन सुरु, या प्रकारे ...

Aayush Neet UG काउंसलिंग साठी रजिस्ट्रेशन सुरु, या प्रकारे करा आवेदन
Ayush NEET UG काउंसलिंग 2020 साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली आहे. आयुष एडमिशन ...