गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated: शनिवार, 26 जून 2021 (19:00 IST)

मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन आला

मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या हॉटेल ताज मध्ये बॉम्ब ठेवल्याचा एक निनावी फोन आज दुपारी पोलीस कंट्रोल रूम मध्ये आल्याचे वृत्त मिळत आहे.हा फोन येतातच पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण हॉटेल आणि त्याच्या परिसरात बीडीडीएस पथकाकांडून तपास कार्य सुरु आहे.
 
आज दुपारी मुंबई पोलीस कंट्रोल रूम ला एक निनावी फोन आला आणि त्या व्यक्तीने ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचे सांगितले.हे वृत्त समजतात पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी पोहोचून तिथल्या संपूर्ण परिसरात बॉम्ब शोधण्याचे कार्य सुरु आहे.

या नंतर हॉटेल परिसराच्या आसपासच्या सर्व भागात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. या पूर्वी मंत्रालयात देखील बॉम्ब ठेवण्याचा निनावी फोन आला होता.परंतु हा फोन बनावट असल्याचे समोर आले होते.हा फोन कुठून आला होता पोलीस तपास करीत आहे.