सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 15 ऑगस्ट 2021 (12:37 IST)

मंत्रालयाच्या समोर शेतकऱ्याच्या आत्मदहनाचा प्रयत्न

आज भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन आहे.हा अमृत महोत्सव संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची राजधानी दिल्लीच्या लालकिल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला.आणि देशाला संबोधित केले.
 
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या मंत्रालयात ध्वजारोहण केले गेले.या वेळी महाराष्ट्राला संबोधित करत ते म्हणाले.की यंदाचे वर्ष कोरोनाच्या सावट खाली आहे,पण पुढचा स्वातंत्र्य दिन कोरोनामुक्त होऊन साजरा करू.या साठी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे हे जनतेचं कर्तव्य आहे.असे आवाहन जनतेला केले.
 
आज देशभरात 75 वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.या निमित्ताने मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला.मुख्यमंत्री त्या परिसरातून बाहेर पडतातच त्याच वेळी एका शेतकऱ्याने मंत्रालयाच्या समोर अंगावर राँकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला.अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे .हा शेतकरी जळगावचा असून त्याचे नाव सुनील गुजर आहे.पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.पोलीस त्याची चौकशी करत आहे.