शनिवार, 8 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (12:10 IST)

मुंबई विद्यापीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी

Bomb threat to Mumbai University Maharashtra News Mumbai News In Marathi Webdunia Marathi
मुंबई विद्यापीठाला बॉम्ब ने उडवून टाकण्याच्या धमकीचा ई-मेल आल्याचे वृत्त मिळाले आहे.सध्या राज्यात फेक कॉल येणे सुरूच आहे.या पूर्वी देखील अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या घरावर तसेच मुंबईत काही ठिकाणी बॉम्ब टाकण्याच्या संदर्भात निनावी फोन कॉल आला होता.आता मुंबई विद्यापीठाला बॉम्बने उडवण्याच्या धमकीचे ई-मेल मिळाले आहे.बी.कॉम चा निकाल लवकर लावा अन्यथा विद्यापीठ उडवून देऊ अशी धमकी या ई-मेल मध्ये देण्यात आली आहे.या ई-मेल मध्ये शिवीगाळ देखील केली आहे.या मध्ये बॉम्बचे छायाचित्र देखील आहे.  
 
सलग तीन दिवस म्हणजे 10,11,12 ऑगस्ट तारखे ला असे धमकीचे ईमेल पाठविण्यात आले होते.हे धमकीचे ईमेल आल्यावर मुंबई विद्यापीठाने पोलिसांना कळवले.पोलिसांना कळतातच त्यांनी थेट मुंबई विद्यापीठाकडे धाव घेतली.मुंबई विद्यापीठाने केलेली ही तक्रार सायबर पोलीस अंतर्गत दाखल करून पुढील तपास सुरु आहे.