शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (21:30 IST)

‘माझ्या बॉयफ्रेंडसोबत का फिरतेस?’ असं म्हणत तरुणींची फ्री-स्टाईल हाणामारी

विक्रोळीतच राहणाऱ्या एका तरुणीने तिच्या मैत्रिणीसोबत येऊन तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरणाऱ्या मुलीला त्याठिकाणी गाठलं. तिला माझ्या बॉयफ्रेंडसोबत का फिरतेस? अशी विचारणा करत बेदम चोप देण्यास सुरुवात केली. संबंधित घटना बुधवारी दुपारी घडली. दोन तरुणींनी एका मुलीला अक्षरशः रस्त्यावर लोळवून तिला बेदम मारहाण केली. अखेर त्यांच्याच मैत्रिणींनी मध्यस्थी करुन तिची या दोन तरुणींकडून सुटका केली. या प्रकरणावर पडदा जरी पडला असला तरी काही तरुणांनी या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ मोबाईलवर शूट केला. 
 
सध्या विक्रोळीत हा व्हिडिओ जोरदार चर्चेत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत मुली शिवीगाळ करत तर आहेच पण त्यासोबत काहितरी बोलतानाही दिसत आहेत. तो माझा बॉयफ्रेंड होता. माझं त्याच्यासोबत सुरु होतं. तर तू का मध्ये पडलीस? असा सवाल करत तरुणी दुसऱ्या तरुणीला प्रचंड मारहाण करताना दिसत आहे.