शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 30 जून 2021 (14:33 IST)

प्रेयसीला इतका राग का आला की तिने प्रियकराची 23 लाखांची सुपरबाईक जाळून राख केली!

यूट्यूबवर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका प्रेयसीने तिच्या प्रियकराची लाखो रुपये किंमतीची दुचाकी आगीत पेटविली.
 
वास्तविक हा व्हिडिओ थायलंडचा आहे, जेथे एका महिलेने आपल्या माजी प्रियकराच्या दुचाकीला आग लावली कारण ती व्यक्ती आता तिच्याशी संबंध ठेवू इच्छित नाही. या 36 वर्षीय महिलेची ही धक्कादायक कारवाई पार्किंगमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली.
 
आपल्या प्रियकराचा सूड घेण्यासाठी ही महिला बँकॉकच्या श्रीनाखरिनविरोट विद्यापीठात पोहोचली. जिथे तो काम करतो. तिथे पोहोचल्यानंतर तिने पार्किंगमध्ये पार्क केलेल्या तिच्या प्रियकराच्या दुचाकीला काहीही विचार न करता पेटवून दिले. सुदैवाने या घटनेने कोणत्याही मानवी जीवनास इजा झाली नाही. मात्र, दुचाकीजवळ पार्क केलेल्या इतर 6 वाहनांनाही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग घटनास्थळी पोहोचला आणि आग आटोक्यात आणली.
 
ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाल्यानंतर यूट्यूबवर शेअर केली गेली. व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आम्हाला श्रीनाखरिनवीरोट विद्यापीठाच्या पार्किंगमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली होती. कोरोना साथीच्या आजारामुळे विद्यार्थी ऑनलाइन वर्ग घेत असल्याने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही, असेही त्यांनी सांगितले.
 
त्याच वेळी त्याने हे देखील सांगितले की, ज्या 23 लाख किंमतीच्या ट्रायम्फ बाईकला महिलेने आग लावली होती, ती प्रेयसीनेच त्याला भेट म्हणून दिली होती जेव्हा ते दोघे संबंधात होते. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे.