गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (11:53 IST)

मुंबईत डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे पहिला मृत्यू

First death due to Delta Plus variant in Mumbai Maharashtra News Mumbai News  coronavirus News In Marathi Webdunia Marathi
कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही,तर आता कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरियंट ने राज्यात कहर करायला सुरुवात केली आहे.कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरियंटमुळे पहिला बळी जाण्याची घटना राज्याची राजधानी मुंबई च्या घाटकोपर येथे नोंदली गेली.डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे 63 वर्षाच्या एका महिलेचा जुलै मध्ये मृत्यू झाला. या महिलेला जुलै मध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंट ची लागण लागली होती.या महिलेला मधुमेहासह इतर आजार होते.आणि मुंबईतील सात रुग्णांपैकी एक होती ज्यांनी डेल्टा प्लस व्हेरिएंटसाठी सकारात्मक चाचणी केली होती. महिलेच्या नमुन्यातून जीनोम सिक्वेंसींगचे निकाल बुधवारी आले, यामुळे मुंबईतील या महिलेची  डेल्टा प्लस व्हेरियंट मुळे  मृत्यूची पुष्टी झाली.
 
धक्कादायक म्हणजे,की महिलेला लसीचे दोन्ही डोस लागले होते.राज्यात आता पर्यंत डेल्टा प्लस व्हेरियंट मुळे 2 लोकांचा बळी गेला आहे. या पूर्वी राज्याच्या रत्नागिरीत 13 जून रोजी एका 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता.आणि या महिलेचा जुलै मध्ये मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.
 
गुरुवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणू (कोविड -19) साथीच्या 6,388 नवीन प्रकरणांची नोंद करण्यात आली, त्यानंतर राज्यात संसर्ग झालेल्यांची संख्या 63,75,390 झाली. त्याच वेळी, 208 रुग्णांच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या 1,34,572 झाली आहे. आज येथे जारी करण्यात आलेल्या आरोग्य बुलेटिनमध्ये राज्य सरकारने म्हटले आहे की, दरम्यान, 8,390 अधिक लोक बरे झाल्याने संक्रमित लोकांची संख्या 61,75,011 झाली आहे. राज्याचा रिकव्हरी  दर 96.86 आहे आणि मृत्यू दर 2.11 टक्के आहे. सध्या राज्यभरात 62,351 सक्रिय प्रकरणे आहेत.