शनिवार, 26 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (20:02 IST)

शरद पवार यांच्या आवाजाची नकल करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आले

शरद पवार यांच्या आवाजाची नकल करणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. प्रशासकीय बदल्यांशी संबंधित प्रकरणांसाठी शरद पवार यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करत त्या व्यक्तीने कॉल केला होता. मंत्रालयात मुख्य सचिवांच्या कार्यालयात या व्यक्तीने फोन करत आपण शरद पवार बोलत असल्याचे सांगितले होते. तसेच प्रशासकीय बदल्यांशी संबंधित हा कॉल होता असे गृह विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवरून बोलत असल्याचे सांगत या व्यक्तीने प्रशासकीय बदल्यांसाठी कॉल केला होता. पण या कॉलचा संशय आल्यानेच मंत्रालयातूनच सिल्व्हर ओकला अशा कॉलबाबतची विचारणा करण्यात आली. त्यामध्ये हा कॉल खोटा असल्याचे समोर आले. त्यानंतरच कॉलशी संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांची टीम कामाला लागली. मुंबईतील गावदेवी पोलिस ठाण्यात याबाबतचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला. तसेच मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने या प्रकरणात पुण्यातून एका व्यक्तीला ताब्यातही घेतले होते. या व्यक्तीसोबत आणखी दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.