सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (10:38 IST)

मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीचे गंभीर आरोप

मानसिक आणि शारिरीक छळवणूक करणे या आणि अशा आदी कलमांखाली मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्याविरोधात  त्यांच्या पत्नीकडून नेरुळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 
 
मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी तक्रार दाखल केली आहेत. गेल्या काही वर्षापासून गजानन काळे आपल्याला मारहाण करत असल्याचंही त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटलं असून त्यांचे अनेक स्त्रियांशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.
 
काय आहे आरोप?
तक्रारीरत सांगितलेल्याप्रमाणे दोघे कॉलेजात एकत्र होतो आणि त्यांच्यात चांगली मैत्री होती. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आणि काळे यांनी लग्नाची मागणी घेतली असताना मुलीने बौद्ध धर्मातल्या मुलाशी लग्न करणार असल्याचं त्याला सांगितलं. ‘मी बौद्ध धर्म स्वीकारतो असं त्याने म्हणत घरच्यांच्या संमतीने लग्न केल्याचं त्यांनी सांगितलं. लग्नानंतरच्या मात्र 15 दिवसांनी गजानन माझ्यासोबत किरकोळ कारणांवरुन भांडण करु लागला तसंच माझा सावळा रंग व माझी जात याच्यावरुन मला टोमणे मारू लागला. जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करु लागला, असं तक्रारीत म्हटलं आहे.”
 
2008 साली आमचं आंतरजातीय प्रेमविवाह झाला. पण तो मला कायम सावळी म्हणायचा, तुझी जात वेगळी आहे तरी देखील मी तुझ्याशी लग्न केले पण माझी चूक झाली. तर तुझ्या वडिलांची पोस्ट बघून मी तुझ्याशी लग्न केले पण त्याचा काही एका फायदा झाला नसल्याचं तो वारंवार बोलायला. तेव्हा आमच्यात बऱ्याच वेळा भांडण झालं आणि या दरम्यान गजानन मला मारहाण करत असे आणि मी माहेरी निघून जात असे पण पुन्हा काही दिवस उटल्यानंतर गजानन माफी मागून मला घरी आणायचा. पण काही दिवस सरले की पुन्हा त्याचं नाटक सुरु व्हायचं”, असंही त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. 
 
“त्याचे अनेक महिलांशी संबंध होते. मी जाब विचारल्यावर तो म्हणायचा की मी राजकारणी आहे, मला कुणी काही करु शकत नाही तर मला तुमच्यापासून स्पेस हवी आहे, असं म्हणत असे. तुझी आणि मुलाची मी यापुढे जबाबदारी घेणार नाही, असं म्हणत सातत्याने त्याने मला त्रास दिलाय”, असंही पोलिस तक्रारीत म्हटलं आहे.