सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (16:18 IST)

धक्कादायक ! नवी मुंबईत मुलीनं आईचा गळा आवळून खून केला

नवी मुंबईतील ऐरोली भागातून एक अतिशय आश्चर्यकारक  आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे अभ्यास करण्यास वारंवार सांगितल्यानंतर संतप्त 15 वर्षीय मुलीने कराटेच्या बेल्टने आईचा गळा आवळून खून केला.आई आपल्या मुलीला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पाहत होती आणि म्हणूनच ती तिला वारंवार प्रवेश परीक्षेसाठी (NEET) अभ्यास करण्यास सांगायची.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 30 जुलैची आहे आणि रबाळे पोलिसांनी अल्पवयीन मुलीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले आहे. मुलीने आपला गुन्हाही कबूल केला आहे. या प्रकरणाचा तपास करणारे एपीआय अविनाश महाजन म्हणाले की, 30 जुलै रोजी शैलेश पवार नावाच्या व्यक्तीने ऐरोली येथे राहणारी त्याची बहीण शिल्पा जाधव हिने तिच्या फ्लॅटचा दरवाजा बंद केल्याची माहिती दिली.
 
कराटे बेल्ट गळ्यात गुंडाळलेला आढळला
जेव्हा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले, शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला, तेव्हा त्या व्यक्तीची 15 वर्षांची भाची आणि 6 वर्षांचा भाचा जमिनीवर बसलेले  दिसले, परंतु बेडरूमचा दरवाजा बंद आहे. दार तोडल्यानंतर शिल्पा जाधव नावाच्या महिलेच्या गळ्यात कराटे ड्रेसचा पट्टा गुंडाळलेला आहे आणि ती जमिनीवर बेशुद्ध पडली होती. यानंतर पोलिसांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
 
हत्येनंतर 9 दिवसांनी मुलगी पकडली गेली 
यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि रविवारी संध्याकाळी सुमारे 9 दिवसांनी कठोर चौकशी दरम्यान शिल्पाच्या 15 वर्षांच्या मुलीने आईची हत्या केल्याची कबुली दिली.तिने पोलिसांना सांगितले की तिची आई तिला वारंवार अभ्यास करण्यास म्हणत होती.म्हणून तिचा खून केला. यानंतर रविवारी रात्री रबाळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मुलीला ताब्यात घेतले.