शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (12:12 IST)

आईच्या मारहाणीत 2 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, आईला अटक

पूर्व विरारमध्ये आईच्या मारहाणीत 2 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायम घटना घडली आहे. या प्रकरणात पो‍लिसांनी आई‍ विरोधात हत्याचा गुन्हा दाखल करुन तिला अटक केली आहे.
 
विरार पूर्व फुलपाडा परिसरातील पारिजात आपारमेंट मध्ये ही धक्कादायक घटना शनिवारी घडली. मुलीचे शव विच्छेदन अहवालाच्या आधारे सोमवारी आरोपी विरोधात विरार पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहा सोनू कुमार सोनी असे आईचे नाव आहे. 
 
या आईने रागाच्या भरात आपल्या 2 वर्षाच्या नानशी नावाच्या मुलीला बेदम मारहाण केल्याने ती बेशुद्ध झाली त्यांनतर पत्नीने याची माहिती पतीला दिल्यानंतर तात्काळ तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखले केले गेले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. चिमुरडीच्या वडलांच्या तक्रारीवरुन प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. 
 
सोमवारी सकाळी मुलीच्या शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तिच्या डोक्यावर अंगावर अंतर्गत गंभीर जखमा आढळून आल्याने या मुलीला मारहाण झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी अधिक तपास करून आरोपी आईला राहत्या घरी अटक केली आहे.
 
या चिमुरडीचे वडील रिक्षा चालक असून आरोपी आई गृहिणी आहे. या दांपत्याला दोघं मुलीच आहे. आईच्या मारहाणीत मृत्यू झालेली मुलगी ही मोठी होती, तर एका वर्षाची लहान मुलगी आहे. आताही आरोपी आई तिसऱ्यांदा गरोदर आहे.
 
आरोपी आई भांडखोर असून नेहमी घरात भांडण करायची तसंच मुलांना नेहमी बेदम मारहाण करत होती. मुलांचा मारताना शेजाऱ्यांनी मध्यस्ती करून सोडवायला गेले तर ती त्यांनाच उलट सुलट बोलून तिथून हाकलून द्यायची. तिच्या रागामुळे एका मुलीची हत्या झाल्याची संतप्त प्रतिक्रिया शेजार्‍यानी दिली आहे.