रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (11:37 IST)

लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा

यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि कोरोनाचं सावट अद्याप असल्यामुळे यंदाच्या वर्षी देखील गणेशोत्सव अगदी साधेपणानं साजरा करण्यात येणार असून यंदाच्या वर्षी लालबागचा राजा विराजमान होणार आहे.राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा काटेकोर पालन करून गणेशोत्सव साजरा केला जाणार अशी माहिती लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाने दिली.
 
यंदा गणेशोत्सव सोहळा 10 सप्टेंबर 2021 ते 19 सप्टेंबर 2021 या कालावधीत साजरा केला जाणार .यंदा लालबागच्या राजाचं हा 88 वा गणेशोत्सव मंडळ साजरा करणार असून आज दिनांक 10 ऑगस्टला सकाळी लालबागच्या राजाचे गणेश मुहूर्त पूजन म्हणजे पाद्यपूजन अत्यंत मंगलमय आणि पावित्र्य पूर्ण वातावरणात संपन्न झाले.