1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 8 ऑगस्ट 2021 (13:34 IST)

महाराष्ट्रात भूस्खलन, मोठ्या प्रमाणात दगड कोसळल्याने किमान सहा घरांचे नुकसान झाले

पावसामुळे महाराष्ट्रातील ठाण्याच्या कळवा भागात रविवारी झालेल्या भूस्खलनामध्ये सहा घरे उध्वस्त झाली परंतु कोणीही जखमी झाले नाही, ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे (आरडीएमसी) प्रमुख यांनी सांगितले की, इंदिरा नगर परिसरात भूस्खलन झाले, त्यानंतर परिसरातील डोंगरांवर जड दगड कोसळले. 
 
स्थानिक अग्निशमन दल आणि आरडीएमसीचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील 20 ते 25 घरांतील रहिवाशांना घोलाई नगर येथील सिव्हिल स्कूलमध्ये हलवण्यात आले,असे अधिकाऱ्याने सांगितले.
 
येथे, रायगडच्या तळिये गावात गेल्या महिन्यात झालेल्या भीषण भूस्खलनामुळे घरे गमावलेल्या पीडितांना मदत देण्यात आली आहे. रायगड जिल्हा प्रशासनाला तळिये  गावातील रहिवाशांना तात्पुरती निवास व्यवस्था देण्यासाठी 26 कंटेनर घरे देण्यात आली आहेत.कायम घर बांधण्याची प्रक्रिया लांब आहे, त्यामुळे सध्या ही कंटेनर घरे दिली जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
 
या गावात मुसळधार पाऊस पडल्यानंतर 22 जुलै रोजी भूस्खलन झाले होते, ज्यामुळे तेथे अनेक घरे उद्ध्वस्त झाली होती. या अपघातात 84 लोकांना आपला जीव गमवावा लागला. घटनास्थळावरून 53 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले तर 31 बेपत्तांना नंतर मृत घोषित करण्यात आले. भूस्खलनापूर्वी गावात 31 घरे होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.