बुधवार, 22 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (16:02 IST)

भाजपत कोणतेही संघटनात्मक बदल नाहीत : फडणवीस

BJP has no organizational changes: Fadnavis Maharashtra News pune news Regional News in Marathi Webdunia Marathi
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील भाजपा नेत्यांची दिल्लीवारी सातत्याने होऊ लागली होती. यामुळे राज्यातील भाजापा संघटनेमध्ये फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती.यावर माजी मुख्यमंत्री आणि राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुण्यात एका कार्यक्रमात आले असताना पत्रकारांशी बोलताना यावर आपली भूमिका स्पष्ट केली.
 
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील भेटीगाठी महाराष्ट्राच्या प्रश्नांवर असल्याचं सांगितलं.“कोणतेही संघटनात्मक बदल नाहीत.नवीन मंत्रिमंडळ झालं आहे.नव्या मंत्र्यांच्या भेटीगाठी,काही महाराष्ट्राचे प्रश्न यासाठीच हे दौरे आहेत. महाराष्ट्रात संघटनात्मक कोणतेही बदल नाहीत”,असं ते म्हणाले.दरम्यान,यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची कोणतीही चर्चा नसल्याचं स्पष्ट केलं.“आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अतिशय चांगलं काम करत आहेत.पक्ष त्यांच्या पाठिशी आहेत, दिल्लीतील हायकमांड त्यांच्या पाठिशी आहेत. आम्ही सगळे त्यांच्या पाठिशी आहोत.कृपया कंड्या पिकवू नका, पतंगबाजी करू नका.चुकीच्या बातम्या करू नका. बातम्या कमी पडल्या, तर मला बातमी मागा”,असं म्हणत त्यांनी प्रसारमाध्यमांना देखील टोला लगावला.