गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (14:09 IST)

काय सांगता ! टी शर्ट वर लसीकरण प्रमाण पत्र

Photo -Twitter
येत्या 15 ऑगस्ट पासून मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार आणि लोकल पूर्ववत सुरु होण्याचा मार्गावर आहे.परंतु ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहे त्यांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
 
लोकल मधून प्रवास करणाऱ्यांना महापालिका कार्यालयातून क्यूआर कोड मिळवणे आणि लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार.असे नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.
 
सध्या प्रसिद्ध कॉमेडियन अतुल खात्री यांचा एक फोटो सध्या वेगानं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या फोटो मध्ये  अतुल यांनी थेट आपल्या टीशर्टवरच लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र छापले आहे.त्यांच्या या फोटोला 10 हजारापेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.लोकल मध्ये प्रवास करण्यासाठी नियमानुसार लोकल प्रवासाचा पास रेल्वेच्या अप वरून मिळवता येऊ शकत.ज्यांच्या कडे स्मार्टफोन नाही ते वॉर्ड ऑफिसमधून किंवा उपनगरी रेल्वे स्थानकावरून पास घेऊ शकतात.