शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (13:13 IST)

मुंबईत रुग्णालयात गॅस गळती,अग्निशमन दलाचे 4 बंब दाखल

दक्षिण मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात गॅस गळती होण्याचे वृत्त समजले आहे.या घटनेची माहिती मिळतातच तातडीने अग्निशमन दलाचे 4 बंब दाखल झाले.
 
सकाळी 11;30 वाजता पाईपलाईन मधून LPG गॅस गळती झाल्यामुळे तातडीने रुग्णालयातून रुग्णांना बाहेर काढले .रुग्णालयाच्या परिसरात गॅसचा वास येत होता.रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब ही माहिती अग्निशमनदलाला दिली.तातडीने चार गाड्या 3 पाण्याच्या टँकर सह घटनास्थळी पोहोचल्या.ज्या ठिकाणी गॅस गळती झाली त्या ठिकाणी जास्त रुग्ण नसल्यामुळे सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. गॅस गळती होण्याचे कारण अद्याप माहिती होऊ शकले नाही.