मुंबईकरांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय दोन दिवसांत घेऊ - आदित्य ठाकरे
मुंबईतली लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून समोर येत आहे. शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर शुक्रवारी उत्तर दिलं.
कोरोनाच्या लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकलनं प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
विदेशात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लसीकरण होऊनही पुन्हा कोरोनाचं प्रमाण वाढत आहेत. त्यामुळं सरकार सर्वसामान्यांची काळजी घेत असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले.
गेल्या अनेक दिवसांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी केली जात आहे. न्यायालयानंही या प्रकरणी सरकारला विचारणा केली होती. तसंच विरोधकांनीही या मुद्द्यावर अनेकदा आंदोलनं केली आहेत.
मात्र आता याबाबत दोन दिवसांत निर्णय होणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.