1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (15:53 IST)

कल्याण, ठाणे जिल्ह्यात सोमवारपासून उपहारगृहे बेमुदत बंद

Restaurants in Kalyan
ठाणे जिल्ह्यात सोमवारपासून उपहारगृहे बेमुदत बंद ठेवली जाणार आहेत.ठाण्यात निर्बंध शिथिल करताना जिल्हा प्रशासनाने उपहारगृहांना वेळ वाढवून न दिल्याने उपहारगृह मालक नाराज आहेत.यामुळे संतापलेल्या उपहारगृह व्यावसायिकांच्या संघटनेने येत्या सोमवारपासून पूर्ण जिल्ह्यात घरपोच सुविधेसह उपहारगृहे बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 वेळ वाढवून देण्याच्या मागणीसाठी आता कल्याणातील हॉटेल व्यावसायिकांनीही हॉटेल्स बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कल्याणातील हॉटेल व्यावसायिकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 
कल्याणातील प्रत्येक  हॉटेल बाहेर आम्हाला न्याय द्या ,निर्बंध शिथिल करा अशा मागणीचे फलक लावण्यात आले होते तसेच गेल्या दीड वर्षांपासून आम्हीही सर्व जण आर्थिक संकटात सापडलो आहोत. गेल्या दिड वर्षांत हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.सरकारने निर्बंध घालताना किंवा शिथिल करताना आमच्या संघटनाना विचारात घेणे गरजेचे होते त्यामुळे दुकानदारांप्रमाणे सरकारने आमचाही विचार करावा. अन्यथा आम्ही देखील हॉटेल बंद ठेवू असा इशारा दिला आहे.