शनिवार, 18 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (13:21 IST)

लोकल प्रवास सुरु करण्यासाठी भाजपचं आज मुंबईत ट्रेन भरो आंदोलन

BJP's train fill agitation in Mumbai today to start local travel Maharashtra News Mumbai  News In Marathi Webdunia Marathi
बस आणि विमानातून प्रवास करण्याची मुभा देण्यात येते. मग रेल्वेतून प्रवास का करू दिला जात नाही?, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला.कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या सर्व सामान्य प्रवाशांना लोकल प्रवास करण्यासाठी परवानगी मिळावी या कारणास्तव भाजप आज मुंबईतील विविध रेल्वे स्थानकात आंदोलन करत आहे.ट्रेन सुरु करण्यासाठी भाजपचे नेते,आमदार व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
 
भाजप घाट कोपर,चर्चगेट,कांदिवली,या विविध रेल्वे स्थानकांवर आंदोलन करत आहे या आंदोलनात विधानपरिषदेचे विरोधी नेते प्रवीण दरेकर आणि अतुल भातखळकर यांचा समावेश आहे. कांदिवली रेल्वे स्थानकावर आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचे वृत्त समजले आहे.
 
प्रवीण दरेकर यांनी हे आंदोलन लोकलने पवास करत केलं.तर घाटकोपरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी ट्रेन भरो आंदोलन केलं.राज्यात सर्व निर्बंध शिथिल केले परंतु लोकल अद्याप सुरु करण्यात आली नाही .सर्व सामान्य माणसांन जगायचे कसे असा प्रश्न दरकार यांनी केला आहे.