गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (15:40 IST)

मुंबई लोकल सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई लोकल कधी सुरू होणार? हा प्रश्न वारंवार विचारला जात असताना या प्रश्नावर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. सर्वसामान्यांसाठी लवकरच लोकल ट्रेन सुरू करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
 
लोकल सुरू करण्याबाबतही विचार सुरू आहे. जबाबदारीचं भान ठेवूनच लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या जी पश्चिम कार्यालयाचं उद्घाटन झालं. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. 
 
मुख्यमंत्री ठाकरे यांनी करोनाच्या संकट काळात मुंबई महापालिकेनं केलेल्या कामाचं कौतुक केलं. 'करोना काळात मुंबई मॉडेलचं सर्वत्र कौतुक झालं. पालिका कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केल्यामुळंच हे शक्य झालं. करोनाला रोखण्याचं काम महापालिकेनं केला. धारावीसारख्या झोपडपट्टीत करोनाला हरवलं. संकटाचा मुकाबला करतानाच नागरिकांच्या सेवेतही खंड पडू दिला नाही. संकटाचा सामना करतानाच मुंबईत विकासकामंही सुरू आहेत,' असं ते म्हणाले. 
 
लोकल वर विचार सुरू आहे. राज्यातल्या इतर शहरात शिथिलता देणार आहोत. पण जबाबदारी बाळगून देणार आहोत. कृपया संयम सोडू नका, कोणी दुष्मन वा कोणी जवळचा नाही, सर्व नागरिकांच्या जीवांची काळजी आहे. त्यामुळे या गोष्टी कराव्या लागतात, असं मुख्यमंत्री म्हणाले.