गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 21 ऑक्टोबर 2024 (08:13 IST)

बाबा सिद्दीकी हत्याकांड : बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी 10वी अटक

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत भगवंत सिंगसह 10 जणांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली आहे. महाराष्ट्रातील मुंबई मधील क्राईम ब्रँचने आरोपी भगवंत सिंग याला बेलापूर येथून अटक केली असून त्याने गोळीबार ज्यांनी केला त्यांना राहण्याची आणि श्स्त्र पुरविण्यात मदत केली होती. तो राजस्थानमधून शस्त्रे घेऊन मुंबईत आला होता. तसेच त्याला 26 ऑक्टोबरपर्यंत मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार भगवंत सिंग ओम सिंग (32) असे आरोपीचे नाव असून तो मूळचा उदयपूर, राजस्थानचा असून सध्या तो नवी मुंबई येथे राहत आहे. तसेच आरोपी भगवंत हा भंगार व्यापारी असून 2 ऑक्टोबर रोजी झालेल्या सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत भगवंत सिंगसह 10 जणांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे माजी मंत्री सिद्दीकी यांची वांद्रे येथे तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. सिद्दीकी यांच्यावर त्यांच्या आमदार मुलाच्या कार्यालयाजवळ हल्ला करण्यात आला होता.