शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 22 सप्टेंबर 2024 (17:27 IST)

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने गुन्ह्याची कबुली दिली

rape
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरच्या शाळेत अल्पवयीन मुलींवर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने डॉक्टर समोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.असे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केले आहे. ऑगस्ट महिन्यात बदलापुरातील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकलींवर नराधम अक्षय शिंदेने अत्याचार केल्याचे समोर आले. नंतर याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आला असून आरोपी अक्षय शिंदेला कडक शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. 

या प्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीचा तपास पूर्ण करण्यात आले आहे. डॉक्टर, शाळेचे कर्मचारी, आणि फॉरेन्सिक टीमच्या अधिकाऱ्यांसह एकूण 20  जणांच्या साक्षीने पोलिसांनी विशेष न्यायालयात आरोप पत्र दाखल केले असून तपासात आरोपी अक्षयने गुन्हा केल्याची कबुली दिली असून मीच दोघी मुलींवर अत्याचार केल्याचे त्याने म्हटले आहे.  

आता पोलीस पुढील कारवाई करण्याचे म्हटले आहे. तपास पथकाने आरोपीच्या कबुलीच्या आधारे दोन आरोपपत्र तयार केली आहे. त्याची पाने 500  हुन अधिक आहे. घटनेच्या दिवशी आरोपी शाळेच्या बाहेर पडताना आणि गेट मधून प्रवेश करतानाचे सीसीटीव्ही फुटेज देखील पुरावा म्हणून सादर करण्यात आला आहे. एसआयटी दलाने राज्यसरकारला या प्रकरणी फास्ट ट्रेक कोर्टात यादी करण्याची विंनती केली आहे. बदलापूर बलात्कार प्रकारणांनंतर बदलापुरात आंदोलन करण्यात आले होते. 
Edited By - Priya Dixit