सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (09:37 IST)

अभिनेत्री अनुपमा पाठकने Facebook Live नंतर मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली

सध्याचा काळ कलाजगतासाठी काही फारसा बरा नाही. मागील काही दिवसांपासून कलाकारांच्या आत्महत्येच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. एक दिवसपूर्वीच टीव्ही अभिनेता समीर शर्मानं आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. आता आणखीन एका अभिनेत्रीनं अनुपमा पाठकने मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
 
भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठकने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 40 वर्षांच्या अनुपमाने हे पाऊल उचल्लयाने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. 
 
अनुपमाने आत्महत्येच्या एक दिवस आधी फेसबुक लाईव्ह केलं होतं. त्यात तिने कोणावरही विश्वास ठेवू नये असा संदेश दिला होता.