सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जानेवारी 2021 (22:26 IST)

बर्ड फ्लूबाबत मुंबई महापालिकेकडून गाईडलाईन्स जारी

बर्ड फ्लू रोगाच्या प्रादुर्भावामुळे चिकन खरेदीत 50 टक्क्यांनी घट झालीय. जिवंत कोंबडी आणि चिकनच्या दरात मोठी घसरण दिसून आलीय. कोबंड्यानंतर कावळे, साळुंखी यांचा संशयास्पद मृत्यूचे प्रकार समोर येतायत. बर्ड फ्लू रोगाच्या पार्श्वभुमीवर राज्यभरात नियंत्रण कक्ष उभारले जाणार आहेत. जिल्ह्याजिल्ह्यातील पशुवैद्यकीय यंत्रणा यासाठी सज्ज झाली आहे.  बर्ड फ्लूबाबत मुंबई महापालिकेने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. मृत पक्षी आढळल्यास महापालिकेच्या १९१६ या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. 
 
अशी आहे  नियमावली 
 
बर्ड फ्लूसाठी राज्यात नियंत्रण कक्ष उभारणार
 
तसंच चिकन मटण दुकानांची स्वच्छता तपासली जाणार आहे. 
 
मृत पक्षी आढळल्यास त्याची माहिती नियंत्रण कक्षाला देण्याचे आवाहन
 
भायखळा येथील राणीबागेत देखील स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होतंय. पक्षांच्या स्वच्छता आणि अधिक देखरेखेखाला ठेवण्यात आलंय.