रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 3 जुलै 2021 (16:15 IST)

नवी मुंबईत बोगस लसीकरण, गुन्हा दाखल

मुंबईतील कांदिवली येथे बोगस लसीकरणानंतर आता नवी मुंबईत बोगस लसीकरण केल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी याप्रकणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हे लसीकरण ज्यांनी कांदिवलीत केले, त्याच्यावर संशय पोलिसांनी व्यक्त करण्यात आला आहे.
 
नवी मुंबईमधील शिरवणे एमआयडीसीतील एटोमबर्ग टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीतील 350 कर्मचाऱ्यांचे बोगस लसीकरण करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी डॉ. मनिष त्रीपाठी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डॉ त्रिपाठी याने याआधी मुंबईतील कांदिवली  येथे बोगस लसीकरण केले असल्याचे निष्पन्न झाले आहेत. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्यावर कांदिवली येथे गुन्हा दाखल केला होता. आता शिरवणे एमआयडीसीतील प्रकारानंतर तुर्भे पोलिसानी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.