मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 20 ऑगस्ट 2022 (09:40 IST)

मुंबईवर 26/11 सारखा दुसरा हल्ला होणार... परदेशातून पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन

Bombay Police Control Room received a threatening call from abroad
देशाची आर्थिक राजधानी आणि मायानगरी मुंबईला पुन्हा हादरवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. या संदर्भात मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला परदेशातून धमकीचा फोन आला आहे. ज्यामध्ये कॉलरने धमकी दिली असून मुंबईत पुन्हा 26 नोव्हेंबर 2008सारखा दहशतवादी हल्ला होईल. सध्या पोलिसांनी या फोन कॉलचा तपास सुरू केला आहे. ही खरोखरच दहशतवादी संघटनेने दिलेली धमकी आहे की कोणा व्यक्तीने गमतीशीर कॉल केला आहे, याचाही तपास केला जात आहे. काही वेळा मुंबई पोलिसांनाही असे हॉक्स कॉल्स येतात. जरी पोलिस प्रत्येक कॉल गांभीर्याने घेतात आणि तपास करतात.ऐन सणासुदीच्या काळात मुंबईवर दहशवादी हल्ल्याचे सावट आले आहे.३१ ऑगस्टपासून गणेशोत्सवदेखील सुरू होत आहे. अशात मुंबईवर दहशतवादी हल्लाचं सावट असल्यानं सुरक्षा यंत्रणांचं टेन्शन वाढलं आहे.सर्वत्र कडेकोट बंदोबस्त करण्यात आले आहे.