शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (12:25 IST)

Sameer Wankhede: समीर वानखेडेंना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी

एनसीबी मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे  यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी समीर वानखेडे यांनी मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ट्विटरवर ही धमकी आल्याचं तक्रारीत सांगितलं आहे. वानखडे यांना आरोपीने टॅग करून हा मेसेज पाठविण्यात आला होता. यावर वानखडे यांनी त्याला उत्तर देखील दिले आहे. त्यानंतर काही तासात आरोपीने ते ट्वीट डिलिट केले.  हे अकाऊंट त्याच दिवशी सुरू करण्यात आले असल्याचे तपासात मिळाले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल केल्यापासून धमक्या येत आहेत. 
समीर यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्र बनवून नोकरी मिळवण्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना क्लीनचिट मिळाली आहे. मुंबई जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने समीर वानखेडे हे अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याचा निर्णय दिला आहे.मीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम नसल्याचे या समितीने म्हटले. समीर वानखेडे यांचे वाडवडील हे हिंदू धर्मीय अनुसूचित जातीतील असल्याचे सिद्ध होत असल्याचेही जातपडताळणी समितीने म्हटले.