सोमवार, 11 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 17 ऑगस्ट 2022 (15:13 IST)

वरळीत दहीहंडीवरून राजकारण, शिवसेनेनेही दहीहंडीला पर्यायी जागा शोधली

मुंबईत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी भव्य दहीहंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे. मात्र, शिवसेनेही त्यांच्या दहीहंडीला पर्यायी जागा शोधली असून, वरळीतच ही दहीहंडी होणार आहे. त्यामुळे आता शिंदे गट आणि शिवसेने यांच्यात दहिहंडीवरून राजकारण सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
 
भाजपाने वरळीच्या जांबोरी मैदानात दहीहंडीचे आयोजन केले आहे. त्यामुळे शिवसेनेचे दहीहंडीचे आयोजन वरळीच्या श्रीराम मिल चौकात केल जाणार आहे. त्यामुळे आता वरळीत शिवसेना आणि भाजपाकडून शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
आशिष शेलार यांनी वरळीच्या जांबोरी मैदानात दहिहंडीचे आयोजन केल्याने शिवसेनेला वरळीतील दहिहंडीच्या आयोजनासाठी जागा शोधावी लागली. विशेष म्हणजे वरळीमध्ये शिवसेनेचे तीन आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद असतानाही आता आशिष शेलार यांनी दहिहंडीचे आयोजन केले आहे.