शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (21:43 IST)

'तो' संशयित काही तासांत पोलिसांच्या ताब्यात

jail
मुकेश अंबानी व त्यांच्या कुटुंबीयांना 3 तासांत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका संशयिताला मुंबई पोलिसांनी काही तासांत ताब्यात घेतले आहे. धमकी दिल्याची तक्रार दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
 
मंगळवारी  सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास रिलायन्स फाउंडेशन हॉस्पीटलच्या सार्वजनिक दूरध्वनी क्रमांकावर एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा एक फोन कॉल आला होता. याबाबत तक्रार डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. त्याच वेळी अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली. तर, एका पथकाने धमकीच्या फोनचा तपास सुरू केला.
 
फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असताना पोलिसांनी एका 57 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याचे नाव विष्णू भूमीक असून तो मानसिक आजारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपी दहिसर पश्चिम मधील एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयाच्या क्रमांकावर फोन करणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानी यांचे नाव घेऊन ही धमकी दिली. अंबानी यांना धमकी देणारे आठ फोन कॉल्स आले होते.