मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळून वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू
मुंबईतील मुलुंडमधील नाणेपाडा परिसरामध्ये एका इमारतीचा स्लॅब कोसळण्याची घटना घडली आहे. यामध्ये देवशंकर शुक्ला (93) आणि आरती शुक्ला (87) या दाम्पत्याचा मृत्यू झाला.ही इमारत पालिकेकडून अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आली होती. घटना घडल्यावर अग्निशमन दल तसेच इतर पालिकेचे आपत्कालिन पथक तेथे पोहोचले. या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. या दुर्घटनेत दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीमध्ये दोन कुटुंब वास्तव्याला होती.
'ग्राउंड प्लस टू' असं या इमारतीचं स्ट्रक्चर होतं. विशेष म्हणजे, ही इमारत पालिका प्रशासनाकडून धोकादायक म्हणून घोषित केली होती. तरीदेखील काही कुटुंबं या इमारतीमध्ये वास्तव्याला होतं.
काल (सोमवारी) रात्री ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ मुंबई महापालिकेचं पथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं. अनेक नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं.घटनेननंतर इमारतीमधील इतर रहिवाशांना इतरत्र हलवण्यात आले.