शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (09:32 IST)

100 व्या स्वातंत्र्यदिनी आदित्य ठाकरे दिल्लीतून येऊन ध्वजारोहण करतील- किशोरी पेडणेकर

kishori pednekar
देशभरात सर्वत्र ध्वजारोहणसह विविध कार्यक्रमांद्वारे स्वातंत्र्यदिन साजरा केला गेला. स्वातंत्र्याला 75 वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त शिवसेना भवनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्याला 50 वर्षं पूर्ण झाल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याहस्ते शिवसेनाभवनामध्ये ध्वजारोहण करण्यात आले होते.
 
या पार्श्वभूमीवर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक विधान केले आहे. 100 व्या स्वातंत्र्यदिनी आदित्य ठाकरे दिल्लीतून येऊन ध्वजारोहण करतील असं त्या म्हणाल्या आहेत.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यातून केलेल्या भाषणात घराणेशाहीवर भाष्य केले. किशोरी पेडणेकर यांनी घराणेशाहीबद्दल फक्त ठाकरे घराण्यालाच का विचारताय असा प्रश्न करुन भाजपातही मुलाला-मुलीला संधी दिली जाते असं म्हटलं आहे