गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (09:19 IST)

मी वंदे मातरम् म्हणणार नाही - माजी मंत्री छगन भुजबळ

chagan bhujbal
एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर तब्बल ३८ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार केला. यानंतर काही दिवसांनी खातेवाटप जाहीर झाले. यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना फोन उचलल्यावर वंदे मातरम् म्हणण्याचे आदेश जारी केले आहेत. यावरून आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी वंदे मातरम् म्हणणार नसल्याचे स्पष्ट करत सरकारी निर्णयावर खोचक शब्दांत टीका केली आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला तर ते जय महाराष्ट्र बोलतात, मी वंदे मातरम् म्हणणार नाही, मी जय महाराष्ट्र म्हणेन, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. मंत्री झाल्यावर आदेश काढला, या निर्णयात वाईट वाटण्यासारखे काही नाही. काही जण 'जय हिंद' बोलतात, काही 'जय महाराष्ट्र' बोलतात, आमचे पोलीस बांधव फोन केल्यावर जय हिंद म्हणतात, शिवसेनेचे लोक जय महाराष्ट्र म्हणतात, असे छगन भुजबळ यांनी संगितले.