मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 13 ऑगस्ट 2022 (13:44 IST)

खालसा कॉलेज आणि SIES कॉलेजमधील 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतली अवयवदानाची शपथ !

khalsa collage
उपलब्ध आकडेवारी आणि विविध अहवालांनुसार, दरवर्षी भारतात प्रत्यारोपणासाठी अवयवांच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागतो. अवयव उपलब्ध नसल्यामुळे दरवर्षी बहुसंख्य लोकांचा मृत्यू होतो कारण वर्षभरात केवळ काहीच प्रत्यारोपण केले जातात. आणि प्रत्येक 10 मिनिटांनी प्रतिक्षा यादीत नवीन नाव जोडले जात आहेत. भारतात अवयवदानाचा दर प्रति दशलक्ष व्यक्तींमागे 0.8 आहे, जो जगातील सर्वात कमी आहे. एक अब्जाहून अधिक लोकसंख्येच्या देशात, दशलक्षांमध्ये एकही अवयवदाता नाही. अवयवांची उपलब्धता वाढवण्याच्या आणि जीवनदान देण्याबाबत जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने, बहु-अवयव प्रत्यारोपण तज्ञ ग्लोबल हॉस्पिटलने गुरु नानक खालसा कॉलेज आणि SIES कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स यांच्या सहयोगाने विद्यार्थ्यांमध्ये अवयव प्रत्यारोपणा बद्दल जनजागृती केली.
 
विद्यार्थ्यांसमवेत कार्यशाळेत ग्लोबल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले आणि अवयवदानाबाबतचे गैरसमज दूर केले. अधिक जीव वाचवण्याच्या प्रयत्नात, जागतिक अवयव दान दिन मृत किंवा जिवंत दात्यांद्वारे निरोगी अवयवांच्या दानाला प्रोत्साहन देतो. मूत्रपिंड, हृदय, स्वादुपिंड, डोळे, फुफ्फुसे इत्यादी अवयवांचे दान दीर्घकालीन स्थिती असलेल्या लोकांना दीर्घ आयुष्य जगण्यास मदत करू शकते.
 
अवयव दानाचे महत्त्व सांगताना डॉ. नीलेश सातभाई वरिष्ठ सल्लागार - ग्लोबल हॉस्पिटल परळ, मुंबई येथे प्लास्टिक, हँड अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी म्हणाले कि, “आपले अवयव दान करण्याचा निर्णय घेऊन तुम्ही किती जीव वाचवू शकता याचा कधी विचार केला आहे? एक अवयवदाता आठ जीव वाचवू शकतो. पुरेसे अवयव उपलब्ध नसल्यामुळे दरवर्षी 5 लाख व्यक्ती अवयवांची आशेने वाट पाहत असतात, वाट पाहताच मृत्यूमुखी पडतात. ग्लोबल हॉस्पिटलला या महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल जागरुकता निर्माण करण्याची संधी दिल्याबद्दल मी दोन्ही महाविद्यालयांचे आभार व्यक्त करू इच्छितो.”
 
डॉ. उदय सांगलोडकर, वरिष्ठ सल्लागार – हेपॅटोलॉजी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट, जे ग्लोबल हॉस्पिटल, परेल मुंबई म्हणाले कि, “हे समजून घेणे अत्यावश्यक आहे की, निरोगी जिवंत दात्याने दान केलेले शरीरातील यकृत हा एकमेव अवयव आहे जो वेळेनुसार त्याच्या सामान्य आकारात पुन्हा निर्माण होऊ शकतो. सामान्यतः, यकृत दाते पुन्हा आपले आयुष्य सामान्यपणे जगू शकतात आणि त्यांच्या यकृताचा काही भाग दान केल्यानंतर त्यांच्या दैनंदिन क्रियाकलापांचे अनुसरण करण्यास सक्षम असतात. बहुतेक लोक ज्यांना यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असते ते अनेक महिने किंवा वर्षे मृत दात्याच्या यकृताची वाट पाहण्यात वाया घालवतात. तथापि, शेवटच्या टप्प्यातील यकृत रोग असलेल्यांसाठी जिवंत यकृत दान हा सर्वोत्तम पर्याय आहे”.