रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 25 जुलै 2022 (10:36 IST)

द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपतिपदाची शपथ, 'महिलांचे हित सर्वतोपरी'

Photo -ANIद्रौपदी मुर्मू यांनी आज संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपतिपदाची शपथ घेतली. शपथ ग्रहणानंतर त्यांनी भाषण केले त्यात त्या म्हणाल्या की या देशातील महिलांचे हित माझ्यासाठी सर्वतोपरी आहे असं राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटले.
 
या भाषणावेळी त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी जमातीचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात, एक भारत श्रेष्ठ भारताच्या दिशेनी आपली वाटचाल व्हावी याकडे प्राधान्य असेल असे त्यांनी सांगितले.
 
"कोरोना काळात भारताने या साथीविरोधात एक धाडसी लढा दिला. नुकताच भारताने 200 कोटी कोरोना लशीच्या डोसचा टप्पा पार केला आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे," असं त्या म्हणाल्या.
 
स्वतंत्र भारतात जन्मलेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.
 
द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल असून, भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित सोमवारी (21 जून) भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रपतिपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
 
"यूपीएच्या घटक पक्षांसोबत राजनाथ सिंह आणि मी चर्चा करून एकाच नावावर सहमतीसाठी प्रयत्न केले. मात्र, एका नावावर सहमती झाली नाही. त्यामुळे भाजपनं संसदीय मंडळाच्या बैठकीत आपला स्वतंत्र उमेदवार घोषित करण्याचा निर्णय घेतला. त्यातून द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर आमची सहमती झाली," अशी माहिती जेपी नड्डांनी दिली.
 
"भाजपच्या पूर्वेकडील भागातून कुणी उमेदवार द्यावा आणि कुणी महिला उमेदवार असावी, असा विचार आम्ही केला. तसंच, आदिवासी समाजातील कुणी राष्ट्रपती आजवर भारतात झाले नाही, त्यामुळे आम्ही आदिवासी समाजातील व्यक्ती उमेदवार म्हणून देण्याचं ठरवलं. त्यानुसार द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर एकमत झालं," असंही नड्डांनी सांगितलं.
 
कोण आहेत द्रौपदी मुर्मू
द्रौपर्दीमुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहे. भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून 1979 मध्ये द्रौपदी मुर्मू बीए उत्तीर्ण झाल्या.
 
पुढे त्यांनी ओडिशा सरकारसाठी लिपिक म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे त्या पाटबंधारे आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक झाल्या. नंतरच्या काळात त्यांनी शिक्षक म्हणून ही काम केलं.
 
त्यांनी श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, रायरंगपूर येथे मानद शिक्षक म्हणून काम केलं. आपल्या नोकरीच्या कारकिर्दीत त्यांनी एक मेहनती कर्मचारी म्हणून आपली ओळख निर्माण केली.
 
1997 मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून 1997 त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या.
 
त्या 2000 आणि 2009 मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या.
 
नंतर त्या आदिवासी जमाती आयोगाच्या त्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या. बिजू जनता दल आणि भाजपच्या सरकारमध्ये त्यांनी वाणिज्य आणि वाहतूक मंत्रिपदाची धुरा सांभाळली.
 
त्यानंतर त्या मत्स्य विभागाच्या मंत्री होत्या. 2015 मध्ये मुर्मू या झारखंडच्या पहिल्या राज्यपाल होत्या. 
 
त्या राष्ट्रपती झाल्या तर आदिवासी समुदायाला एक मोठं स्थान देशाच्या राजकारणाला मिळेल. तसंच ते नरेंद्र मोदींची प्रतिमेला उजाळा देण्यासाठी उपयुक्त ठरेल. 
 
तत्पूर्वी विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे करण्यात आलं आहे. या निवडणुकीसाठी विरोधकांकडून शरद पवार, फारुख अब्दुल्ला यांचं नाव समोर आलं होतं. मात्र दोघांनीही त्याला नकार दिला होता.