शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (14:43 IST)

Nitish Kumar : नितीश यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेजस्वी उपमुख्यमंत्री

जनता दल (संयुक्त) नेते नितीश कुमार यांनी बुधवारी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनीही नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
 
71 वर्षीय नितीश यांनी मंगळवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि सात पक्षांच्या महाआघाडीच्या आमदारांच्या पाठिंब्याने नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा केला. त्यांनी आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 
 
जनता दल (संयुक्त) नेते नितीश कुमार यांनी बुधवारी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्याशी चर्चा केली. लालू प्रसाद यांनी कुमार यांच्या निर्णयाचे स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या असे आरजेडी प्रमुखांची मुलगी आणि खासदार मीसा भारती यांनी सांगितले. लालू प्रसाद एका आजारातून बरे झाले असून ते आपल्या मुलीसोबत येथे राहतात.
 
लालू प्रसाद यांचे एकेकाळचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले कुमार यांनी बिहारमधील 2015 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्याशी युती केली होती आणि युतीने निवडणूक जिंकली होती. आता सात वर्षांनंतर त्यांनी पुन्हा भारतीय जनता पक्ष (भाजप) सोबतची युती तोडून राजदशी हातमिळवणी केली आहे.