शनिवार, 28 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जून 2024 (11:58 IST)

मुंबई : पालघरमध्ये पूल बुडाला, रेल्वेची गती मंद केली....IMD घोषित केला मुसळधार पावसाचा अलर्ट

mumbai rain
पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे देहर्जे नदीवर बनवलेला पूल बुडाला आहे. यामुळे पालघर आणि मनोर वाडा मधील संपर्क तुटला आहे. पूल तुटल्यामुळे रेल्वेच्या गतीवर प्रभाव पडला आहे. 
 
महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे घेल्या काही दिवसांमध्येच आगमन झाले आहे. तसेच आता मुसळधार पाऊस कोसळत आहे. झालेल्या मुसळधार पावसामुळे पूल पाण्याखाली घेल्याची बातमी समोर आली आहे. हा पूल तुटल्यामुळे पालघर आणि मनोर वाडा मधील संपर्क तुटला आहे. तर पश्चिम रेल्वेच्या बोईसर-उमरोली स्टेशनमध्ये रेल्वे ट्रॅक अप आणि डाऊन दोन्ही लाईन वर पाणी भरले आहे. याचा प्रभाव रेल्वेवर पडला आहे. ज्यामुळे रेल्वेची गती मंद करण्यात आली आहे. 
 
मुंबई, ठाणे आणि भिवंडी मध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक परिसर जलमय झाले आहे. तसेच मान्सून विभागाने 20 जून पर्यंत मुसळधार पावसाचा अलर्ट घोषित केला आहे.