1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जून 2024 (09:54 IST)

तामिळनाडू मध्ये विषारी दारू पिल्याने 29 जणांचा मृत्यू, काय म्हणाले सीएम स्टालिन

death
तामिळनाडू मधील कुल्लाकुरुची जिल्ह्यामध्ये विषारी दारू प्यायल्याने 29 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. जेव्हा की, 15 जणांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणात त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. त्याच्याजवळून कमीतकमी 200 लिटर बेकायदेशीर दारू मध्ये मिथेनॉल मिळालेले आहे. 
 
तामिळ्नाडुचे मुख्यमंत्री एम के स्टालिन हे सोशल मीडिया एक्स वर म्हणाले की, दारूमध्ये भेसळ करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच याला जवाबदार अधिकारींवर देखील कारवाई करण्यात येईल. मुख्यमंत्रींनीं या घटनेची सीबी-सीआईडी चौकशीचे आदेश दिले आहे. 
 
विपक्ष नेता इडापड्डीचे पलानीस्वामी म्हणाले की, बेकायदेशीर दारू प्यायल्यानंतर कमीतकमी 40 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते म्हणाले की, जेव्हापासून द्रमुक सरकार सत्तेमध्ये आले आहे. तेव्हा पासून बेकायदेशीर दारूमुळे अनेकांचे मृत्यू होत आहे. मी विधानसभेमध्ये नेहमी हा मुद्दा मांडत असतो आणि कारवाईची मागणी करीत असतो.