शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 मार्च 2025 (15:48 IST)

मध्य रेल्वेने उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला

Central Railway News
Central Railway News: उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, मध्य रेल्वेने ३३२ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या मुंबई-नागपूर, करमाळी, तिरुअनंतपुरम, पुणे-नागपूर आणि दौंड-कलाबुर्गी दरम्यान धावतील. तसेच उन्हाळ्याच्या सुट्ट्या मार्चच्या अखेरीस सुरू होतात आणि यावेळी लोक मोठ्या संख्येने प्रवास करतात.  
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने हे पाऊल उचलले आहे, जेणेकरून उन्हाळ्याच्या काळात प्रवाशांना गाड्यांमध्ये अधिक सुविधा मिळतील आणि कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळता येईल. या काळात जास्त गर्दी असलेल्या मार्गांवर उन्हाळी विशेष गाड्या धावणार आहे.  या उपक्रमामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान सुविधा तर मिळेलच, पण रेल्वे विभागासाठीही हे एक सकारात्मक पाऊल ठरेल.