पंतप्रधान मोदींचा आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेत्याला नेसवली साडी
महाराष्ट्रातील कल्याणमध्ये पंतप्रधान मोदींचा आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते प्रकाश उर्फ ज्यांना मामा पगारे यांना रस्त्याच्या मधोमध साडी नेसण्यास भाग पाडले. तसेच या घटनेचा व्हिडिओ व्हायरल देखील झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साडी घातलेला एक फोटो बनवला होता. व पगारे यांनी एक वीडियो पोस्ट केला ज्याचे शीर्षक होते "माफ करा मुलींनो, मला पण ट्रेंड मध्ये राहायचे आहे." व हा व्हिडीओ एका लोकप्रिय गाण्यावर सेट करण्यात आला होता.
तसेच कल्याणमधील भाजप कार्यकर्त्यांनी जेष्ठ कांग्रेस नेते प्रकाश उर्फ 'मामा पगारे यांना भर रस्त्यात साडी नेसवून विरोध प्रदर्शन केले. मामा पगारे यांनी मोदींचा साडी घातलेला मॉर्फ फोटो बनवला होता. आता ज्यावर भाजप कल्याण जिल्हा शाखेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. व पंतप्रधान मोदींचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.
तसेच तीव्र प्रतिक्रिया देत भाजप कार्यकर्त्यांनी विरोध प्रदर्शन केले.
तसेच मंगळवारी सकाळी मानपाडा रोडजवळ पगारे असल्याचे कळताच भाजप कार्यकर्त्यांनी पगारे यांना गाठून जबरदस्तीने साडी नेसवण्यास भाग पाडले व त्यांना इशारा देखील देण्यात आला. तसेच नंदू परब म्हणाले की, कोणी सोशल मीडियावर वरिष्ठ नेत्यांचा अपमान केला तर आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ.
Edited By- Dhanashri Naik