कल्याण पोलिसांनी केली 7 बांगलादेशींना अटक
महात्मा फुले पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत 7 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. यामध्ये सहा महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. या कारवाईने पोलिसांनाही आश्चर्य वाटले कारण या तिघांकडून भारत सरकारने जारी केलेले आधार कार्ड जप्त करण्यात आले आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बांगलादेशी नागरिकांचे भारतात वास्तव्य पूर्णपणे बेकायदेशीर होते. सर्वप्रथम, संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी कल्याण स्टेशन परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने स्वतःची ओळख बांगलादेशी नागरिक म्हणून करून दिली आणि ती अंबरनाथच्या शिवाजी नगर पोलिस स्टेशन हद्दीतील एका सोसायटीत राहते असे सांगितले.
पोलिसांच्या पथकाने तातडीने त्या सोसायटीवर छापा टाकत तिथून एकूण पाच महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले. आता अटक केलेल्या बांगलादेशींची संख्या सात झाली आहे. पोलीस तपासात आढळून आले की या पैकी काहींनी भारतीय आधारकार्ड देखील बनवले होते. त्यांच्याकडून मोबाईलफोन जप्त केले आहे.
या आरोपींनी आधार कार्ड कसे बनवले याचा शोध घेण्यासाठी सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यामध्ये बनावट कागदपत्रे आणि मध्यस्थांचा सहभाग असल्याचा संशय आहे. पोलिस सायबर सेल जप्त केलेल्या मोबाईल फोनची तांत्रिक तपासणी करत आहे जेणेकरून त्यांचे नेटवर्क आणि संपर्क शोधता येतील.
Edited By - Priya Dixit