सोमवार, 24 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2024 (08:59 IST)

महाविकास आघाडीत सर्व जागांवर एकमत, 25 जागांवर घेणार हायकमांड अंतिम निर्णय

Maharashtra Vidhan Sabha Election 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये 263 जागांवर एकमत झाले आहे.  पण 25 जागांसाठी अजून निर्णय नाही. ज्यावर अंतिम निर्णय महाविकास आघाडीच्या घटक दलांचे हायकमांड घेणार आहे. 
 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 20 नोहेंबरला मतदान होईल आणि 23 नोहेंबरला मतमोजणी करण्यात येईल. यादरम्यान महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप वरून पेच निर्माण होतांना दिसत आहे. याबद्दल आज महाविकास आघाडीची बैठक झाली , आजच्या बैठकीला घेऊन एनसीपी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी जबाब दिला आहे. 
 
अनिल देशमुख म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये फक्त 10 प्रतिशत जगावर चर्चा बाकी आहे. आज आम्ही पुन्हा सीट वाटप करीत बैठक घेऊ. महाविकास आघाडीच्या नेत्यांचे प्रतिनिधी मंडळ निवडणूक आयोगाची मुंबई मध्ये भेट घेईल. काही तयारीला घेऊन काही तक्रारी आमच्याकडे आल्या आहे. त्या निवडणूक आयोगाला सांगितल्या जातील.तसेचतीन दलांचे प्रमुख नेता याचा निर्णय घेतील.  
 
 या दरम्यान नाना पटोले म्हणाले की, 263 जागांवर एकमत झाले असून ज्या 25 जागांवर तिन्ही दलांचा दावा आहे, अश्या जागांचा निर्णय तिन्ही दलांचे प्रमुख घेतील. तसेच ते म्हणाले की, 25 विवादित जागांची सूची प्रत्येक घटक दलाच्या हायकमांडला  पाठवण्यात येईल. या जागांवर अंतिम निर्णय उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांना घ्यायचा आहे. तसेच मुंबई मध्ये केवळ अश्या तीनच जागा आहे जावर आजून निर्णय झालेला नाही.