मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 27 डिसेंबर 2021 (08:08 IST)

विधान भवनात कोरोना चाचणी, तब्बल ३२ जणांना कोरोनाची लागण

Corona test in Vidhan Bhavan
मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनाला कोरोना संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. विधान भवनात घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीतून तब्बल ३२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.
 
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधान भवनात येणार्‍या सर्वांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दुसर्‍यांदा आरटीपीसीर चाचण्या करण्यात आल्या. यात एकूण २ हजार २०० लोकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये एकूण ३२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यांना कोरोनाची लागण झालेली आहे अशांमध्ये पोलीस कर्मचार्‍यांसह, शासकीय कर्मचारी आणि पत्रकारांचा समावेश आहे. यात आमदार, मंत्री अथवा कोणत्याही नेत्याचा समावेश नाही.
 
भाजप आमदार समीर मेघे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. यानंतर आणखी ३२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.