1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (11:36 IST)

लसीकरण केंद्रावर तरुणाचा गोंधळ ! तरुण रजिस्ट्रेशन करून लस न घेता पसार झाला

सध्या कोरोनाच्या चा प्रादुर्भाव पुन्हा दिसू लागला आहे. सध्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंट ओमिक्रोन देखील धुमाकूळ घालत आहे. राज्यात कोरोनाचे प्रकरण पुन्हा उद्भवू लागले आहे. सध्या लसीकरण मोहिमेत तेजी आली असून राज्यात नऊ कोटीहून अधिक लोकांचे लसीचे एक डोस  पूर्ण करून महाराष्ट्राने आघाडी ठेवली आहे.  तरीही आज ही काही लोकांमध्ये लस घेण्याबद्दल भीती आहे. त्यामुळे अशे लोक लस घेण्यास टाळाटाळ करतात. असेच घडले आहे. मुंबईच्या डोंबिवलीतील एका लसीकरणाच्या केंद्रावर. हे लसीकरण केंद्र डोंबिवली पूर्व नेहरू मैदानात असून गुरुवारी या केंद्रावर लस घेण्यासाठी ऋषिकेश मोरे नावाचा 29 वर्षाचा तरुण आला. त्याने लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी नोंदणी केली. पण तो लस न घेताच पळू लागला. केंद्रावरील कर्मचाऱ्यांना ही गोष्ट समाजतातच त्यांनी तरुणाला अडविले. त्यावर मी टॉयलेटला जाऊन येतो असा बहाणा केला. आधी लस घे नंतर जा असे त्याला सांगण्यात आले. नंतर त्याने पळून जाण्याच्या प्रयत्न केला असता त्याला केंद्रावरील दोघं कर्मचाऱ्यांनी पकडले मात्र तो लस न घेता त्यांना ढकलून पळून गेला. या घटनेमुळे केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाला होता.