1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 16 एप्रिल 2022 (12:19 IST)

शिवसैनिकांची 'मातोश्री'बाहेर गर्दी, राणा दाम्पतीविरोधात गोळा झाले

मुंबईत 'मातोश्री' बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याचा राणा दाम्पत्याने इशारा दिला होता. यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून 'मातोश्री' बाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देत असल्याचे दिसून येत आहे.
 
मातोश्री हे आमचं श्रद्धास्थान आहे आणि तिथं येऊन कुणी आव्हान देण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसैनिक ते सहन करणार नाही. जशास तसं उत्तर दिलं जाईल, असं शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले.
 
दरम्यान, शिवसैनिकांनी मातोश्री बाहेर केलेल्या गर्दीमुळे वांद्रे कलानगर परिसरात वाहतुक कोंडी निर्माण झाली असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
 
आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचू असा इशारा दिला होता. त्यामुळे चांगलंच राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे.